Nagpur News: अकोल्यातील घटनेनंतर नागपुरात हायअलर्ट, शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Latest News: नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
Nagpur Police
Nagpur PoliceSaam Tv

संजय डाफ, नागपूर

Nagpur Police: अकोला जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी दोन गटात वाद (Akola Incidence) झाला. किरकोळ वादानंतर या दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली आहे. अकोल्यानंतर अहमदनगरमध्ये देखील दोन गटांमध्ये (Ahmednagar Incidence) राडा झाल्याची घटना समोर आली. या दोन्ही घटनांमुळे एकच खळबळ उडाली. अशामध्ये या घटनांच्या पार्श्वभूमींवर नागपूर पोलिस (Nagpur Police) सतर्क झाले आहेत.

अकोल्यातील घटनेनंतर नागपूरमध्ये पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. नागपूरमध्ये पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात येत आहे. त्याचसोबत अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

Nagpur Police
Akola Violence Update: अकोल्याच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश, आतापर्यंत 30 आरोपींना अटक

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, 'अकोल्यासारखी घटना नागपूरमध्ये होऊ नये यासाठी आम्ही हाय अलर्टवर आहोत. सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. सध्या नागपूर पोलिस अर्ट मोडवर आहेत.' तसंच, शहरामध्ये पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे. धार्मिक नेत्यांशी संपर्क साधला जात आहे. सध्या शहरात शांतता आहे. पण अशी घटना घडली तर आम्ही यावर नियंत्रणासाठी सज्ज आहोत.', असे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील जुन्या शहरात शनिवारी दोन गटात वाद झाला. किरकोळ वादाचं रुपांतर नंतर हिंसाचारात झाले. या गटात सुरुवातीला हाणामारी झाली. त्यानंतर जमावाने गाड्या जाळल्या. अकोल्यातील या हिंसाचाराची गृहमंत्र्यांनी दखल घेतली आहे. अकोल्याच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली आहे.

Nagpur Police
Ahmednagar Violence: अकोल्यानंतर अहमदनगरमध्ये दोन गट भिडले, शेवगावमध्ये तुफान राडा, घटनेत अनेक जण गंभीर

तर, अकोल्यातील घटनेनंतर अहमदनगरमध्येही दोन गटात तुफान राडा झाला आहे. रविवारी रात्री शेवगाव शहरामध्ये दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत पोलिस तपास करत आहेत. गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com