आर्थिक स्थिती खालावल्याने उच्चशिक्षित दांपत्याने वडिलांना पाठवले वृद्धाश्रमात!

कोरोना काळात नोकरी गमावल्याने आणि घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल झाल्याने, या आजोबांना त्यांच्या मुलाने आणि सुनेने वृद्धाश्रमात दाखल केल आहे.
आर्थिक स्थिती खालावल्याने उच्चशिक्षित दांपत्याने  वडिलांना पाठवले वृद्धाश्रमात!
आर्थिक स्थिती खालावल्याने उच्चशिक्षित दांपत्याने वडिलांना पाठवले वृद्धाश्रमात!गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : कोरोना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक स्थिती खालावल्याने एका उच्चशिक्षित दांपत्याला आपल्या आजारी असलेल्या वडिलांना चक्क वृद्धाश्रमात ठेवण्याची अत्यंत दुर्देवी वेळ ओढवली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे हतबल झाल्याने, इच्छा नसताना ही आपल्या वडिलांना पुण्यातील एका दांपत्याने वृद्धाश्रमात पाठवलं आहे.

हे देखील पहा -

मुळतः कर्नाटक मधील असणाऱ्या पण, सध्या पुण्यात स्थिरावलेल्या या उच्चशिक्षित दांपत्याला कोरोना काळात आपली नोकरी गमवावी लागली. त्यात घरात वडील आजारी असल्याने वडिलांचा सांभाळ करायचा कसा असा प्रश्न या मध्यमवर्गीय दांपत्याला पडला, कोरोना लॉकडाऊनमुळे एक तर दोन वर्षापासून नोकरी मिळत नव्हती. त्यात वडिलावर असलेल्या प्रेमामुळे वडिलांनाही वृद्धाश्रमात पाठवता येत नव्हतं.  ही परिस्थिती वडिल असलेल्या त्या दुर्दैवी बापाच्या लक्षात येताच, त्यांनी आपल्या मुलाकडे वृद्धाश्रमात जाण्याचा आग्रह धरला, शेवटी मुलानेही आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या बापाला वृद्धाश्रमात दाखल केलं. 

आर्थिक स्थिती खालावल्याने उच्चशिक्षित दांपत्याने  वडिलांना पाठवले वृद्धाश्रमात!
अंबरनाथमध्ये सहाय्यक आयुक्त पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

म्हातारपण आल्यावर बऱ्याचदा आई-वडील संभाळायला नकोसे होतात, त्यामुळे समाजातील अनेक जण आपल्या आई-वडिलांचा तिरस्कार करत त्यांना वृद्धाश्रमात दाखल करतात. मात्र, मातृसेवा सेवाभावी संस्थेत दाखल झालेला आजोबांची गोष्ट थोडी वेगळी आहे. यात मुलगा आणि सुनेला आपल्या सासऱ्या विषयी प्रचंड आत्मीयता आणि प्रेम आहे. मात्र,नोकरी गेल्यामुळे आणि घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल झाल्याने, या आजोबांना त्यांच्या मुलाने आणि सुनेने वृद्धाश्रमात दाखल केल आहे.

याची खात्री झाल्यावरच आम्ही आजोबांना आमच्या वृद्धाश्रमात दाखल करून घेतलं असं वृद्धाश्रमाच्या संचालिका संस्कृती गोडसे आणि सांगितलं. मानवी आयुष्यामध्ये कित्येक संकटे येत असतात,  त्यापासून खचून न जाता आपण त्या संकटाचा सामना देखील करत असतो, मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करताना, कित्येकांना आपल्या काळजावर दगड ठेऊन अत्यंत कठोर निर्णय घेण्यास भाग पाडलंय.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com