हिंदू-मुस्लीम एकोप्याचं अनोखं दर्शन; बुलडाण्यात हिंदू बांधवांकडून मशिदीला भोंगा भेट

Buldana News : बुलडाणा तालुक्यातील केळवद गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊड स्पीकर म्हणजेच भोंगा भेट दिला आहे.
Buldhana Latest Marathi News, Hindu Muslim unity news in Marathi
Buldhana Latest Marathi News, Hindu Muslim unity news in MarathiSaam TV

बुलडाणा: देशभरासह महाराष्ट्रात आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' साजरी केली जात आहे. सर्व मशीद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापलं असतानाच, बुलडाणा जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याचं एक अनोखं दर्शन घडलं आहे. बुलडाणा तालुक्यातील केळवद गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊड स्पीकर म्हणजेच भोंगा भेट दिला आहे. (Buldhana Latest Marathi News)

Buldhana Latest Marathi News, Hindu Muslim unity news in Marathi
'अल्टिमेटमवर देश चालतो का?' राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय राऊत संतापले

एकीकडे राज्यात भोग्यांवरून राजकारण तापलं असताना सामाजिक सलोखा जपत केळवद गावातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील मशिदीला भोंगा भेट देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध केला. अवघ्या 5 हजार लोकसंख्या असलेल्या केळवद गावात मुस्लिमांची फक्त 3 टक्के संख्या आहे. गावात एक मशीद असून या मशिदीवर अजूनही भोंगा नव्हता, हीच बाब लक्षात घेता गावातील हिंदू बांधवांनी एकत्र येत गावातील मशिदीला भोंगा भेट दिला. यावेळी गावातील सरपंचासह असंख्य गावकऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला.

या देशात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी तसेच महागाईसारखे असंख्य मुद्दे आहेत. त्यावर प्रकाश टाकण्याऐवजी राज ठाकरे हनुमान चालीसाच्या नावाखाली बहुजनांचे माथे भडकवत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. इतकंच नाही तर, राज ठाकरे सुपारी घेऊन राज्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न करताहेत असा आरोपही केळवदच्या ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com