यवतमाळमधील हिंदु-मुस्लीम बांधव एकत्र मिळून करतायत बाप्पाची आराधना

यवतमाळमधील मुस्लिम समाजातील युवक गणेशमूर्तीची स्थापना करतायत. अनेक वर्षांपासून मुस्लिम-हिंदू युवक मिळून गणेशोत्सव उत्साहात साजरा करतायत.
यवतमाळमधील हिंदु-मुस्लीम बांधव एकत्र मिळून करतायत बाप्पाची आराधना
यवतमाळमधील हिंदु-मुस्लीम बांधव एकत्र मिळून करतायत बाप्पाची आराधनासंजय राठोड

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळ: मुस्लिम समाजातील युवक गणेशोत्सव साजरा करतात असे म्हटलं तर कोणाचाच विश्वास बसणार नाही, मात्र हो यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये मुस्लिम समाजातील युवक हिंदू समाजातील युवकांना सोबत घेऊन दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. (Hindu-Muslim brothers in Yavatmal worship Bappa together)

हे देखील पहा -

सुरूवातीला मुस्लिम समाजातील काही युवकांनी गणेशमुर्ती बसवविण्याबाबत हिंदू समाजातील युवकांना कडे भावना बोलून दाखवली. त्यानंतर हिंदू समाजातील युवकांनी चांगली संकल्पना सुचविली असे म्हणुन होकार दिला आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला. गेल्या दहा वर्षांपासून गारपीट गणेश उत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे. या मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि ७० टक्के पदाधिकारी हे मुस्लिम समाजातील युवक आहेत. सुरूवातीला आरती वैगरे येत नव्हती, मात्र आता मुस्लिम समाजातील युवकांना आरती देखील मुकपाठ असल्याने दोन्ही वेळेच्या आरत्या तेच म्हणतात.

यवतमाळमधील हिंदु-मुस्लीम बांधव एकत्र मिळून करतायत बाप्पाची आराधना
नाशकात जमावबंदी लागू; पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी

हिंदू आणि मुस्लिम समाजात चांगला संदेश देण्याचे काम गारपीट गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी गणेशोत्सवाच्या माध्यमातून करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com