Kolhapur Bandh Update : कोल्हापूरात शुकशुकाट, हिंदुत्ववादी संघटनांचे बंदचे आवाहन; दहा वाजता घेणार महत्त्वाचा निर्णय (पाहा व्हिडिओ)

Kolhapur Bandh Today: आज दहा वाजता शिवाजी चाैकात जमणार कार्यकर्ते.
kolhapur, kolhapur bandh
kolhapur, kolhapur bandhsaam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur Bandh Latest Updates : समाज माध्यमात वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज (बुधवार, ता. 7) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोल्हापूर शहरात एक हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. (Latest Marathi News)

kolhapur, kolhapur bandh
Chandrapur Crime News : डोंगरहळदीत नव-याचा बायकोसह मुलींवर कुऱ्हाडीचा घाव, एकीचा मृत्यू

कोल्हापुरात (Kolhapur) काही युवकांनी वादग्रस्त स्टेटस ठेवले. त्यामुळे तणाव निर्णाण झाला त्यातून दोन गट आमने-सामने आले. शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाल्याच्या घटना देखील घडल्या. परिणामी कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पाेलिसांची माेठा कुमक घटनास्थळी दाखल झाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी काही जणांना तंबी दिली.

kolhapur, kolhapur bandh
Shivrajyabhishek Din : ठरवलं तर रायगड किल्ला ताब्यात घेऊ; लाखाे शिवप्रेमींच्या साक्षीने संभाजीराजे गरजले (पाहा व्हिडिओ)

दरम्यान आज (बुधवार) हिंदुत्ववाद्यांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पाच पेक्षा जास्त लोक एकत्र जमण्यास प्रशासनाने बंदी केली आहे. जमाव जमवणे, मोर्चे काढणे सभा घेणे याला प्रशासनाने बंदी घातली आहे. अप्पर जिल्हाधिकारी भगवानराव कांबळे यांनी बंदीचे आदेश काढले आहेत.

हा बंद मागे घ्यावा असे आवाहन प्रशासनाने हिंदुत्तवादी संघटनांना केले आहे. परंतु ते बंदवर ठाम राहिले आहेत. दरम्यान आज सकाळपासून शहरातील व्हिनस काॅर्नर परिसरासह अन्य ठिकाणी शुकशुकाट आहे. बस, रिक्षा सुरु आहेत. आज दहा वाजता शिवाजी चाैक परिसरात हिंदुत्ववादी संघटना एकत्र येणार आहेत. त्यानंतर बंदची हाक देण्यात येणार आहे तसेच प्रशासनाबराेबर चर्चा देखील हाेऊ शकते. त्यातून महत्त्तवाचा निर्णय घेण्यात येईल असेही ही समजते.

kolhapur, kolhapur bandh
Satara Crime News : दारूच्या नशेत तर्रर्र... मुख्यालयातील पाेलिस निरीक्षकाला पब्लिकने बेदम चाेपला, व्हिडिओ व्हायरल झाला ना भाऊ

या आंदाेलनात शिवसेना सहभागी हाेणार असून राजेश क्षीरसागर (कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ,महाराष्ट्र राज्य(कॅबिनेटमंत्री दर्जा) यांच्यावतीने समाज माध्यमातून एक संदेश पाेहचविला जात आहे. त्यामध्ये सर्व शिवसेना पदाधिकारी युवासेना, सर्व अंगीकृत संघटनांमधील शिवसैनिकांनी आज (ता. 7) सकल हिंदूसमाजा तर्फे धर्मांध प्रवृत्ती विरोधात कोल्हापूर बंद पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी व्हावे. तसेच सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी " शिवालय" शिवसेना मुख्यालय येथे सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com