हिंगोली रोजगार हमी घोटाळा प्रकरण; प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह ९ जणांवर फसवणुकीचा गुन्हा

बोगस मजूर दाखवून 26 लाख 37 हजार 990 रुपयांचा भ्रष्टाचार
Hingoli MAR scam
Hingoli MAR scamSaam Tv

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील 8 गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस आला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत निर्मिती करण्यात येणाऱ्या गँबियन बंधाऱ्याच्या कामात बोगस मजूर दाखवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला. याप्रकरणी औंढा पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी जगदीश शाहू यांच्यासह एकूण 9 जणांविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hingoli Latest Crime News)

औंढा पंचायत समितीमध्ये या अधिकाऱ्यासह रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगतमताने बोगस कामे दाखवले. ग्रामपंचायतीकडून मजुरांची मागणी नसताना बोगस मजूर दाखवून 26 लाख 37 हजार 990 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले.

सदरील प्रकरण उघडकीस येताच हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गावातील मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाची सविस्तर बातमी साम टीव्हीने दाखवली होती. त्यानंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या प्रकरणात तातडीने समिती नेमून चौकशी सुरू केली. या चौकशीत हा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, औंढा पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच या गुन्ह्यात आरोपी असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी फरार झाले आहेत. या फरार झालेल्या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com