Hingoli: भावना गवळींच्या निकटवर्तीयांना ईडीने घेतले ताब्यात

हिंगोलीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका व्यापाऱ्यास घेतले ताब्यात घेतले आहे. खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांच्या शी संबंध असल्याचा संशय आहे.
Hingoli: भावना गवळींच्या निकटवर्तीयांना ईडीने घेतले ताब्यात
Hingoli: भावना गवळींच्या निकटवर्तीयांना ईडीने घेतले ताब्यातSaam Tv

संदीप नागरे

हिंगोली : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ईडीने ED कार्यवाही चे सत्र सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी वाशिम Washim मध्ये छापेमारी केल्या नंतर आता, मराठवाड्याच्या हिंगोलीत Hingoli देखील इडीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारत एका व्यापाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हे देखील पहा-

मध्यरात्री व सकाळी छापा टाकत या व्यापाऱ्याच्या घरातून त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून, सकाळपासून त्याची चौकशी देखील सुरू आहे.

Hingoli: भावना गवळींच्या निकटवर्तीयांना ईडीने घेतले ताब्यात
गोव्यात केलेल्या कामावरच आम्ही मतं मागणार: देवेंद्र फडणवीस

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यापाऱ्याचे इंदिरा चौक परिसरात किराणा दुकान असून शासकीय योजनेत अंतर्गत खाद्य तयार करण्यासाठी हा व्यापारी किराणा सामान पुरवठा करत असल्याचीही माहिती आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय असलेले कंत्राटदार सईद खान यांच्या कडे हे कंत्राट असून त्यांना हिंगोली मधील हा व्यापारी मालाचा पुरवठा करत असल्याची माहिती आहे, या मधूनच मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय इडीच्या अधिकाऱ्याना असल्याने ही कार्यवाही केली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.