हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा उत्सव सलग दुसऱ्या वर्षीही रद्द

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव इसवी सन १८५७ पासून सुरू झालेला आहे
हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा उत्सव सलग दुसऱ्या वर्षीही रद्द
हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा उत्सव सलग दुसऱ्या वर्षीही रद्दसंदीप नागरे

हिंगोली - कर्नाटकातील मैसूर नंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचा उत्सव म्हणून ओळख असलेला हिंगोलीचा ऐतिहासिक दशहरा उत्सव सलग दुसऱ्या वर्षी देखील, प्रशासनाकडून कोरोना नियमावलीचे कारण देत हा उत्सव रद्द करण्यात आला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी देखील विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या उत्सवाला नागरिकांना मुकावे लागणार आहे. हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव इसवी सन १८५७ पासून सुरू झालेला आहे. महान संत मानदासबाबा यांनी या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा पासून २०२० साला पर्यंत अखंडित पने हा उत्सव सुरू होता.

हे देखील पहा -

मात्र कोरोना रोगाच्या संकटामुळे या उत्सवात सलग दुसऱ्या वर्षी देखील खंड पडला आहे. दरम्यान सार्वजनिक दसरा महोत्सवाचा उत्सव रद्द करण्यात आला असला तरी. विजयादशमीच्या दिवशी या ठिकाणी होणारे धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरानजीक असलेल्या खाकीबाबा मठामध्ये होणार आहेत. मात्र या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार नसल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा उत्सव सलग दुसऱ्या वर्षीही रद्द
पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटल्यानं पत्नी जखमी

प्रशासनाने दसरा उत्सव रद्द केल्याने, सार्वजनिक दसरा महोत्सव प्रेमी सह भाजप कडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याची चर्चा असून पंकजा मुंडे देखील सावरगाव येथे दसरा मेळावाचा कार्यक्रम घेणार असल्याची चर्चा आहे. तिकडे कार्यक्रमांना परवानगी मिळत असेल तर हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा उत्सवाला देखील परवानगी देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार रामराव वडकुते यांनी केली आहे. दरम्यान, लाखो नागरिकांच्या उपस्थिती मध्ये साजरा होणारा हिंगोलीचा ऐतिहासिक दशहरा उत्सव सलग दोन वर्ष भरला नसल्याने हा उत्सव भरविण्यात येणार रामलीला मैदान तेथील पुरातन वस्तू सह घाणीच्या विळख्यात सापडल आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.