Hingoli: येलदरी धरणाच्या संरक्षण भिंतीला तडे!

संरक्षण भिंतीला मोठ मोठी छिद्र पडल्याने, त्यातून पाणी बाहेर येत आहे.
Hingoli: येलदरी धरणाच्या संरक्षण भिंतीला तडे!
Hingoli: येलदरी धरणाच्या संरक्षण भिंतीला तडे! संदीप नागरे

संदीप नागरे

हिंगोली: मराठवाड्यातील प्रमुख धरण म्हणून ओळख असलेल्या हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी धरणाच्या Yeldari Dam संरक्षण भिंतीला मोठ मोठी छिद्र Hole पडल्याने, त्यातून पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यासह येलदरी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील पहा-

धक्कादायक बाब म्हणजे, मागील दीड वर्षा पासून ही स्थिती असताना, या ठिकाणी अद्याप देखील, दुरुस्ती करण्याच्या अनुषंगाने कोणतीही पावले उचलली नाहीत. दरम्यान या भिंतीमधून बाहेर येणाऱ्या पाण्याची पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ पथकाने पाहणी देखील केली असल्याचे , धरण प्रशासनाने सांगितले आहे. लवकरच या बाबत पाहणी करणाऱ्या पथकाचा अहवाल येईल त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.

Hingoli: येलदरी धरणाच्या संरक्षण भिंतीला तडे!
Pune: 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद; तरुणीने घोटला प्रियकराचा गळा

मात्र असे असले तरी सद्या, येलदरी धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने संरक्षण भिंतीवर दाब येऊन पाणी बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नसल्याने या ठिकाणची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी येलदरी गावातील नागरिकांनी केली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com