हिंगोली : किन्होळा गावात आसना नदीचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर

वसमत तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे आसना नदी दुथडी भरुन वाहत आहे. ही नदी किन्होळा गावाजवळुन वाहते.
हिंगोली : किन्होळा गावात आसना नदीचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर
आसना नदीचे पाणी किन्होळा गावात

प्रभाकर बारसे

गिरगाव ( जिल्हा हिंगोली ) : वसमत तालुक्यातील किन्होळा गावात मंगळवारी (ता. १३) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला आलेल्या पुराचे पाणी १५ ते २० गावकऱ्यांच्या घरात घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन पाहणी केली आहे.

वसमत तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे आसना नदी दुथडी भरुन वाहत आहे. ही नदी किन्होळा गावाजवळुन वाहते. मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने आसना नदीला पुर आला. या पुराचे पाणी रात्री उशिरा गावात शिरल्याने अनेकांच्या घरात या पाण्याने मुक्काम ठोकला. गावात आलेले पाणी पंधरा ते वीस गावकऱ्यांच्या घरात शिरले यात विश्वंभर चव्हाण, माणिक चव्हाण, पांडुरंग चव्हाण, राहुल चव्हाण आदी गावकऱ्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजले गावकऱ्यांना रात्र जागुन काढावी लागली.

हेही वाचा - लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच सद्य: स्थितीत देखील जोरदार पाऊस होत असल्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जलाशयात एकूण ८३ टक्के जलसाठा झाला

किन्होळा गाव आसना नदीच्या काठावर असून जवळपास सर्वच नंदी नाले भरुन जात होते. त्यात कुंरुदा येथील जलेश्वर नदीचे पाणी सुध्दा याच मार्गाने जाते. त्यामुळे आसना नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात आले होते. रात्री आलेल्या पाण्यामुळे एकच धावपळ झाली होती. दरम्यान, बुधवार ( ता. १४ ) तलाठी नंदा डाके व ग्रामसेवक श्री. पवार यांनी गावात भेट देऊन पाहणी केली आहे. गावात येणाऱ्या आसना नदीच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावल्यास गावकऱ्यांना धोका होणार नाही. या नदीला पुर आल्यावर ते पाणी गावात येते प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गावात येणारे पाणी बाहेर कसे काढता येईल याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com