Zilla Parishad School : गुरुजी तुमचं हे वागणं बरं नव्हं! आक्रमक ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले टाळे (पाहा व्हिडिओ)

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज ग्रामस्थ आक्रमक झाले हाेते.
Hingoli, zilla parishad school,
Hingoli, zilla parishad school, saam tv news

Hingoli : खासगी शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धांमुळे जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीणहून जाते. तरीही बहुतांश जिल्ह्यात पालक त्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत माेठ्या विश्वासाने दाखल करतात. परंतु काही शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे असे चित्र असल्याचे आज हिंगाेली जिल्ह्यात समाेर आले.

Hingoli, zilla parishad school,
Mid Day Meal : उंदराच्या लेंड्या, अळ्यांसह खिचडी खाऊ घातली, ग्रामस्थांचा आराेप; विद्यार्थी रुग्णालयात दाखल

हिंगोलीच्या इसापूर गावांत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील शिक्षक उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी आज जिल्हा परिषद शाळेस टाळे ठाेकले. तसेच शिक्षकांच्या बेजबाबदारपणाचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

Hingoli, zilla parishad school,
दीडशे फुटांपर्यंत खेचत नेले..., कार 360 डिग्री फिरल्यानंतर समाेर दरी..., अपघाताचा थरार सांगताहेत कदम (पाहा व्हिडिओ)

इसापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून शेकडो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. ग्रामस्थांचे म्हणण्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकूण आठ शिक्षकांची (teachers) आवश्यकता असताना या शाळेत सात शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Hingoli, zilla parishad school,
Pune : CBSE बोगस शाळा प्रकरणी आज चौकशी होणार ; पाहा सविस्तर बातमी

ज्या शिक्षकांची नियुक्ती आहे. ते शिक्षक दररोज शाळेत उशिरा येत असल्याची तक्रार वारंवार विद्यार्थी पालकांकडे करीत हाेते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज ग्रामस्थ आक्रमक झाले हाेते. त्यांनी थेट शाळेला टाळे ठाेकले. अचानक झालेल्या या प्रकरामुळे उपस्थित असलेले काही शिक्षक गाेंधळून गेले. परंतु ग्रामस्थांच्या त्राग्यापुढे त्यांचे काही चालले नाही. (Breaking Marathi News)

Hingoli, zilla parishad school,
Maharashtra News : शिंदे- फडणवीस सरकारवर माेठा दबाव टाकण्याचे शिक्षकांचे प्लॅनिंग; जाणून घ्या कारण

ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बाेलताना शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षण विभागाला आम्ही वेळोवेळी विनंती केली मात्र तरी देखील शिक्षक शाळेत उशिरा येत असल्याने आज आ्म्हांला नाईलाजास्तव शाळेला (school) कुलुप लावावे लागले आहे. आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे गावकऱ्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com