Hingoli News: कर्तव्यावरून सुटी घेऊन घरी आलेल्या जवानाच्या दुचाकीला वाहनाची धडक; जागीच मृत्यू, गावावर पसरली शोककळा

हिंगोलीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
Hingoli  News
Hingoli News Saam tv

Hingoli News : हिंगोलीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुटीवर आलेल्या ३५ वर्षी जवानाचा जागीच मृत्यू झाला आहे.

गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुनील खरात असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सैन्य दलातील जवान सुनील खरात हे आठ ते दहावर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाले होते. सुनील खरात सध्या जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर होते. खरात हे १ महिन्याच्या सुटीवर आले होते.

त्यामुळे गुरुवारी सकाळी हिंगोली (Hingoli) येथून दुचाकी वाहनावर त्यांच्या गावाकडे मकोडी येथे गेले होते. त्या ठिकाणी अर्थात मकोडी येथून पुन्हा हिंगोली येथे निघाले होते. यावेळी रात्रीचे साडे आठ वाजता वाजले होते. त्यावेळी हिंगोली ते नर्सी मार्गावर राहोली पाटीलजवळ आले होते.

Hingoli  News
Pune News: क्षुल्लक कारणावरुन पोटच्या मुलाने जन्मदात्या आईला संपवलं, पुण्यातील मन सून्न करणारी घटना

त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला‎ धडक दिली. या धडकेत सुनील यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली.

तर या अपघातात सुनील खरात यांच्या दुचाकीचा चुराडाच झाला. तर सुनील यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची‎ माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस (Police) दलाचे काही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

Hingoli  News
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईत तीन महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न; काळाचौकी परिसरात खळबळ

हिंगोली ग्रामीण‎ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक‎ मगन पवार, उपनिरीक्षक संजय केंद्रे,‎ जमादार किशोर पवार यांच्या‎ पथकाने भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीर भागात नेमणूक असलेले खरात यांचा आपघात झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळतात खरात यांचं जन्मगाव असलेल्या मकोडीवर शोककळा पसरली आहे. या‎ घटनेमुळे मकोडी गावावर शोककळा‎ पसरली आहे.‎

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com