Hingoli: चुलत बहिण भावाची गळफास घेत आत्महत्या

चुलत बहीण भावांनी गळफास घेत आत्महत्या
Hingoli News
Hingoli NewsSaam tv

हिंगोली : हिंगोलीच्या आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील डोंगरकडा गावात दोन सख्‍ख्या चुलत बहीण भावांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (hingoli news brother and sister ​​commit suicide by hanging)

Hingoli News
स्पिरिटसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

डोंगरकडा गावातील ऐश्वर्या पंडित (वय 18) व आनंदा पंडित (वय 28) असे गळफास घेऊन जीवन संपवलेल्या (Hingoli News) चुलत बहीण भावांची नावे आहेत. ऐश्वर्या व आनंद हे दोघेही नात्याने सख्खे चुलत बहीण भाऊ असून ते डोंगरकडा गावातील एकाच गल्लीमध्ये राहायचे. सोमवारी सायंकाळी स्वतःच्या घरात बहिणीने तर रात्री भावाने शेतामधील झाडाला गळफास घेत जीवन संपवले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी (Police) दोघांचेही मृतदेह आखाडा बाळापूर येथील शवविच्छेदन कक्षात दाखल करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट

या घटनेमुळे संपूर्ण बाळापुर परिसरासह पंडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र या दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत बाळापुर पोलिसांनी कोणतीही माहिती अद्यापपर्यंत दिलेली नाही. या घटनेचा बाळापूर पोलीस तपास करत असून पोलिसांच्या चौकशीनंतर या दोघांच्याही आत्महत्येचे कारण पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com