Mahavitran च्या सहाय्यक अभियंत्यावर हल्ला, कर्मचा-यांचा आंदाेलनाचा इशारा; एकावर गुन्हा दाखल

या घटनेनंतर विद्युत विभागातील कर्मचारी आक्रमक झाले.
Mahavitran, Hingoli
Mahavitran, Hingolisaam tv

Hingoli Mahavitran News : सध्या राज्यभरात महावितरणकडून विजेच्या देयकाची वसुली मोहीम सुरू आहे. महावितरण विभागामार्फत वेगवेगळी पथके नेमून, वीज वसुली व वीज चोरी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. हेच काम करीत असताना हिंगोलीत (hingoli latest news) महावितरण (mahavitran) विभागाच्या फिरत्या पथकावर जीवघेणा हल्ल्याचा प्रकार घडला आहे. (Breaking Marathi News)

Mahavitran, Hingoli
Loss Of Chilli : अवकाळीचा झटका... नंदूरबारच्या मिरची व्यापाऱ्यांना 50 लाखांचा फटका; सरकारच्या निर्णयाकडं लक्ष

ही घटना हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव शिवारात घडली आहे. वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता विनायक शिंदे (mahavitran officer vinayak shinde) हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत पानकनेरगाव शिवारात गेले हाेते. तेथे केशर मशीनवर वीज चोरी केल्याचे उघड झाले.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत मीटरमध्ये येणाऱ्या सर्व्हिस वायरला तोडून वीज चोरी केल्याचे पथकास आढळले. दरम्यान ही वीज चोरी पकडल्याचा राग केशर मालक माणिक देशमुख यांना आला. त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीची तक्रार महावितरण अधिकारी यांनी पाेलिसांत दिली.

दरम्यान महावितरणचे अधिकारी विनायक शिंदे या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना मारहाण झाल्याचे समजताच विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करणा-याचा निषेध नाेंदवला. मारहाण करणा-यांना तत्काळा अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कर्मचा-यांनी दिली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या घटनेच्या तक्रारीनूसार माणिक देशमुख यांच्या विरोधात सेनगाव पोलीस स्थानकात शासकीय कामात अडथळा आणणे तसेच विजेची चोरी करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com