हिंगोली एसटी कर्मचाऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारा

मुख्यमंत्री साहेब आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार
हिंगोली एसटी कर्मचाऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारा
हिंगोली एसटी कर्मचाऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारासंदीप नागरे

हिंगोली - गेल्या आठ दिवसांपासून राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्याच्या मागणीसह इतर मागण्या घेऊन संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या सुरु असून हिंगोली मध्ये काल एसटीच्या वाहकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या कर्मचाऱ्यावर हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान, आजपर्यंत आर्थिक नैराश्य पोटी, 35 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी जीवनयात्रा संपवली तर शेकडो जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र राज्यसरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप हिंगोलीत या संपकरी कर्मचाऱ्यांनी करत हा निर्वाणीचा इशारा सरकारला दिला आहे. हिंगोली आगारात संप सुरू असल्याने शिवशाही, लाल परी व परिवर्तन अशा सर्व बसेस बंद आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com