अबब! हिंगोली वाहतूक शाखेने वसूल केला पंचवीस लाखांचा दंड

बुलेट दुचाकीच्या सायलेन्सर मध्ये बदल करून धुमाकूळ घालणाऱ्या गाड्यांचे सायलेन्सर थेट वाहतूक शाखेत जमा
अबब! हिंगोली वाहतूक शाखेने वसूल केला पंचवीस लाखांचा दंड
अबब! हिंगोली वाहतूक शाखेने वसूल केला पंचवीस लाखांचा दंडसंदीप नागरे

हिंगोली - महागड्या दुचाकी खरेदी करत त्यांच्या सायलन्सर मधील आवाजात बदल करून कर्कश आवाजाने शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बुलेटधारी युवकांना हिंगोली वाहतूक पोलिसांनी चांगलाच धडा शिकविला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशाने, अश्या दुचाकी चालकांचे सायलेन्सर काढून ते थेट वाहतूक शाखेत जप्त केले आहे.

हे देखील पहा -

या सोबतच वाहतूक पोलिसांनी मागील काही महिन्यात परिवहन विभागाचे नियम मोडून बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या दहा हजार वाहनचालकांकडून प्रलंबित असलेले पंचवीस लाखांचे चलन दंड देखील वसूल केला आहे. नांदेड परिक्षेत्रात नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून येवढ्या मोठ्या प्रमाणात दंड वसूल करणारा हिंगोली जिल्हा पहिलाच ठरला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.