Hirakani Kaksha In Mumbai : मुंबईत ठिकठिकाणी सुरू करणार ‘हिरकणी कक्ष’, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Mumbai Hirakani Kaksha: मुंबई शहरामध्ये माता आणि बालकांच्या सोयीसाठी अद्ययावत हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
Hirakani Kaksha In Mumbai
Hirakani Kaksha In Mumbaisaam tv

Hirakani Kaksha will start at various places in Mumbai: गर्दीच्या ठिकाणी स्तनदा मातांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मुंबईत विविध ठिकाणी हिरकनी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालये, पोलिस स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन मुंबई शहरामध्ये माता आणि बालकांच्या सोयीसाठी अद्ययावत हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

बाळांना दूध पिण्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समिती मार्फत 17 हिरकणी कक्ष स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्या अंतर्गत पहिल्या हिरकणी कक्षाचा शुभारंभ मुंबई सेंट्रल बसस्थानक येथे मंत्री केसरकर यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी सुपेकर, मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती शोभा शेलार आदी उपस्थित होते.

Hirakani Kaksha In Mumbai
Shivrajyabhishek Sohala News : ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

केसरकर म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी तीन टक्के निधी खर्च करण्यात येतो. त्याअंतर्गत मुंबईतील विविध बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात येतील. हे सर्व कक्ष वातानुकूलित केले जातील. या कक्षांमध्ये महिला आणि बालकांना विश्रांती घेता येईल. प्रत्येक जिल्ह्याला अशी सुविधा असावी, यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बस चालक तसेच वाहकांसाठी सुद्धा मागणीनुसार अद्ययावत विश्रांती कक्ष बनविण्यात येतील अथवा त्यांचे नूतनीकरण करण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले. कामा हॉस्पिटल येथे मुंबईत येणाऱ्या निराश्रीत महिलांसाठी कक्ष उभारण्यात आला असल्याचे ते म्हणाले. (Latest Political News)

Hirakani Kaksha In Mumbai
Wrestlers Protest: टिकैत यांच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटू गंगाकाठावरून माघारी परतले! सरकारला ५ दिवसांचा अल्टीमेटम

कामगारांसाठी देखील सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे सांगून कामगार केंद्र अत्याधुनिक करून तेथे स्विमिंग पूल, रेस्टॉरंट, जीम, नेमबाजी सुविधा, ॲस्ट्राटर्फ तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याने येथील सोयी-सुविधा देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com