
औरंगाबाद : शरद पवार (Sharad pawar) नास्तिक आहेत हे मी मागील सभेमध्ये बोललो ते झोंबल. मात्र, मला माहिती होतं तेच मी बोललो. शरद पवारांच्या कन्येनेच लोकसभेत सांगिंतलं आहे की, माझे वडील नास्तिक आहेत. यापेक्षा जास्त काय पुरावा देऊ मी असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं ते आज औरंगाबादमधील (Aurangabad) सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणावर देखील टीका केली. ते म्हणाले, आज राजकारणाची काय परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली जात आहे. वाटेल ते बरळतायत, बोलतायत पुढच्या येणाऱ्या पिढ्या आहेत त्या राजकारण्यांकडे बघताना काय विचार करत असतील काय हे राजकारण, हा आहे आपला महाराष्ट्र?
ज्या महाराष्ट्राने समाजवाद, बुद्धांचा विचार दिला, सर्वात जास्त समाजसुधारक दिले त्यातुन आम्ही काहीच प्रेरणाच घेणार नाही. या उलट रोज राजकारणी आई बहिणींवरुन शिव्या देतायत राज ठाकरेच भाषण आहे, हल्ला गुल्ला करा आणि निघून जावा आपल्याला काय करयाचं आहे. असा विचार तुम्हा करता आणि राजकारण्यांना हेच हवंय असं राज म्हणाले.
पाहा व्हिडीओ -
'शरद पवार म्हणाले मी दोन समाजात दुही माजवतोय हे महाराष्ट्रासाठी योग्य नव्हे असं पवार म्हणत आहेत. मात्र, पवारसाहेब आपण जाती जातींमध्ये भेद निर्माण करतायत ना त्याने दुही माजतेय. प्रतेक व्यक्ती जातीतून बघायची, पुस्तक वातचना सुद्धा लेखक कोणत्या जातीचा आहे बघायचं. तसंच मी बोलल्यापासूनच ते राष्ट्रवादींच्या सभांमधून शिवाजी महाराजांचं नावं घ्यायला सुरुवात झाली. आता काय तर व्हिडीओ काढतायत गीत रामायण ऐकतायत आणि शेजारी शिवाजी महाराजांच पुस्तक ठेवलं आहे. त्या दिवशी मी म्हंटल शरद पवार नास्तिक आहेत ते झोंबल. मला माहिती होतं ते बोललो लगेच देवाचे फोटो काढले. पण आपल्या कन्येने लोकसभेत बोललं आहे की माझे वडील नास्तिक आहेत. आता यापेक्षा जास्त काय पुरावा देऊ मी' असंही राज म्हणाले.
तसचं मी माझ्या आजोबांची पुस्तक वाचली आहेत. मात्र तुम्ही तुम्हाला हवं तशी पुस्तक वाचलीत, मात्र तुम्ही संदर्भासहीत वाचा ते लिखान त्यांनी केलेलं लिखान हे व्यक्तीसापेक्ष आहे. तो माणूस हिंदू धर्म माननारे होते. माझे आजोबा भट भिक्षुकीच्या विरोधात होते. धर्म माणणारा माणूस होते असही ते म्हणाले.
Edited By - jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.