Udgir fort: उदगीरच्या किल्ल्यात बुरुजाखाली गुहेत सापडले २ ट्रक तोफगोळे, ५ भल्यामोठ्या तोफा

लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या किल्ल्यातील बुरूजाखाली गुहेत दोन ट्रक तोफगोळे सापडले आहेत.
Udgir fort: उदगीरच्या किल्ल्यात बुरुजाखाली गुहेत सापडले २ ट्रक तोफगोळे, ५ भल्यामोठ्या तोफा
Udgir fort: उदगीरच्या किल्ल्यात बुरुजाखाली गुहेत सापडले २ ट्रक तोफगोळे, ५ भल्यामोठ्या तोफाSAAM TV

Latur Udgir Fort : लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या किल्ल्याची (Udgir Fort) स्वच्छता करताना किल्ल्यात एका बुरुजाखालील गुहेत जवळपास दोन ट्रक तोफगोळे, पाच तोफा सापडल्या आहेत. या शिवकालीन ठेव्याचं जतन केलं पाहिजे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

Udgir fort: उदगीरच्या किल्ल्यात बुरुजाखाली गुहेत सापडले २ ट्रक तोफगोळे, ५ भल्यामोठ्या तोफा
Video : कोल्हापूरकर १०० सेकंद होणार स्तब्ध! लोकराजाला देणार अनोखी मानवंदना

हिंदू साम्राज्य महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी सावळे, सोलापूरचे किशोर माने, औरंगाबादचे दत्तू हाडोळे, उस्मानाबादचे नागेश जाधव यांच्यासह राज्याच्या २६ जिल्ह्यांतील ८० जणांच्या पथकाने गेल्या चार दिवसांपासून लातूरमधील (Latur) उदगीरच्या किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पथकाने स्वखर्चाने उदगीरला येऊन किल्ल्यातील भिंतीवर वाढलेली झुडपे, विहिरींतील गाळ काढणे, गुहा स्वच्छ करणे आदी कामे सुरू केली आहेत. उदगीरच्या किल्ल्यातील बुरुजाखालील गुहेमध्ये दोन ट्रकहून अधिक शिवकालीन तोफगोळे सापडले आहेत. त्यामुळे इतिहास अभ्यासकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सोमवारी किल्ल्यातील गुहेची स्वच्छता सुरू असताना सापडलेले तोफगोळे आणि तोफा आणि या किल्ल्याचे जतन करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा शिवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

इसवी सन १७६० साली उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला. मराठ्यांचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी आपले सैन्य घेऊन मैदान गाजवले. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीरपासून झाल्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. या किल्ल्यात साठवून ठेवलेले तोफगोळे हे चौदाव्या किंवा पंधराव्या शतकातील असावेत, असा अंदाज या पथकाचे प्रमुख शिवाजी पवार यांनी वर्तवला आहे. उदगीरच्या किल्ल्यातील गुहेची स्वच्छता सुरू असताना दोन ट्रकहून अधिक शिवकालीन तोफगोळ्याचा साठा सापडला आहे. त्यामुळे अभ्यासकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

उदगीर किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. राज्यातील अन्य गडकिल्ल्यांचीही तशीच अवस्था आहे. शिवप्रेमी या ठिकाणी येऊन स्वच्छता आणि संवर्धन करण्याचे काम करतात. मात्र, संवर्धनासाठी आलेल्या शिवप्रेमी आणि शिवभक्तांची अडवणूक केली जाते. त्यांना परवानगी दिली जात नाही. सरकार, लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व खाते गडकिल्ल्यांकडे लक्ष देत नाहीत, असे शिवाजी पवार म्हणाले.

Edited By - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com