अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश!

महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे.
अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश!
अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश!SaamTvNews

खेड : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. परंतु इतर राज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

हे देखील पहा :

प्रतिबंधित पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते. परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा अवैध पद्धतीने राज्यात आणून त्याचे वितरण आणि विक्री केली जाते. यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस विभागाने संयुक्तपणे मोहिम राबवावी.

अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश!
रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुपाली मोरेला ठाणे महापालिकेने दिले हक्काचे घर

पोलिस यंत्रणांनी या सर्व अन्नपदार्थांची उत्पादन, विक्री, साठवणूक, वितरण व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अधिक दक्ष राहून प्रभावीपणे कारवाई करावी. तसेच प्राप्त तक्रारीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com