Holi Festival 2023: काय सांगता! विद्यार्थ्यांनी लिहल्या ६०० शिव्या; अनोख्या होळीची होतेय राज्यात चर्चा...

Holi Festival 2023: 'शिव्यांकडून ओव्यांकडे' या अनोख्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे...
Bhandara News
Bhandara NewsSaamtv

Bhandara: देशभरात सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशभरात विविध प्रदेशात होळी साजरी करण्याच्या पद्धती देखील विविध आहेत. मात्र सध्या भंडारा जिल्ह्यातील अनोख्या होळीची सर्वत्र चर्चा होत आहे. भंडारा शहरातील लाल बहादुर शास्त्री शाळेने शिव्यांकडून ओव्यांकडे हा उपक्रम राबवत विद्यार्थ्यांनी ६०० शिव्यांची होळी पेटवली. काय आहे हा उपक्रम चला जाणून घेवू. (Latest Marathi News)

Bhandara News
Khushbu Sundar: 'मी आठ वर्षाची होते अन्...' भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचे वडिलांवर गंभीर आरोप; सांगितला धक्कादायक अनुभव

देशभरात सर्वत्र होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच निमित्ताने भंडारा (Bhandara) शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या मराठी भाषा समितीने एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. मुलांच्या बोलण्यात कायम येणारे शब्द,अर्थही माहित नसलेली शिवराळ भाषा, यावर उपाययोजना म्हणून समूपदेशनासाठी शिव्यांकडून ओव्यांकडे या स्पर्धेचे आयोजन केले गेले. यामध्ये माहित असलेल्या, ऐकलेल्या, प्राणी, पक्षी,शरीरयष्टी, वर्ण, रंगरुप, आई, बहिणींना उद्देशून दिल्या जाणा-या अश्लील शिव्या चक्क मुलांकडून संकलित केल्या गेल्या. (Holi Celibration 2023)

Bhandara News
Imtiyaz Jaleel : औरंगजेबाशी आमचा काही संबंध नाही, कबर जिथे हलवायची तिथे हलवा, खा. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

या उपक्रमात तब्बल ६०० शिव्या जमा झाल्या. संकलित झालेल्या शिव्यांचे कागद होलीकामातेस समर्पित करण्यात आले. यासह सर्वांनी पुन्हा शिव्या देणार नाही, वाईट बोलणार नाही अशा आशयाची शपथ पण घेतली. दरम्यान, "मुलांना सुसंस्कारित करुन शिक्षण प्रवाहात पुढे नेण्यासाठी योग्य दिशा ठरवणे गरजेचे असते. मुलांच्या शिवराळ भाषेवर विधायक मार्गानेच प्रयत्न करावेत या उद्देशाने शिव्यांकडून ओव्यांकडे या उपक्रमाचे आयोजन केले" असे प्रतिपादन शाळा प्रशासनाने केले आहे. या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com