केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नाशिक दौरा अचानक रद्द; कारण काय ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा नाशिक दौरा रद्द झाला आहे. अमित शाह यांच्या ऐवजी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय हे नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नाशिक दौरा अचानक रद्द; कारण काय ?
Amit Shah News, Amit Shah Nashik tour cancelled, Nashik NewsSaam Tv

अभिजीत सोनावणे

नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा नाशिक दौरा रद्द झाला आहे. अमित शाह यांच्या ऐवजी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय हे नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचं नियोजन पूर्ण झालेलं असताना दौरा अचानक रद्द झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, 'अग्निपथ' योजनेवरून वातावरण तापल्याने अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ( Amit Shah Latest News In Marathi )

Amit Shah News, Amit Shah Nashik tour cancelled, Nashik News
'विधानपरिषद निवडणूक कठीण आहे पण...'; देवेंद्र फडणवीसांनी केले भाजप आमदारांना मार्गदर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्रंबकेश्वर येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २१ जून रोजी साजरा करण्यात येणार होता. मात्र, अमित शाह यांचा नाशिक (Nashik) दौरा रद्द झाल्याने या नाशिकमध्ये ( ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील ७५ ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्र्वर मंदिरातील योग दिवस साजरा झाल्यानंतर अमित शाह स्वामी समर्थ गुरुपीठ केंद्र, मांगीतुंगी पर्वतावर भगवान ऋषभदेव यांचा सोहळ्याला भेट देण्याची शक्यता होती. परंतु शाह यांचा दौरा रद्द झाल्याने तिही भेट रद्द झाली आहे.

Amit Shah News, Amit Shah Nashik tour cancelled, Nashik News
.....तर ठाकरे सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिला इशारा

दरम्यान, केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'अग्निपथ' योजनेमुळे (Agnipath Scheme) देशात संतपाचे वातावरण पसरले आहे. या योजनेविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलकांनी निदर्शने (Agnipath protest) केली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने योजनेत अनेक बदल केले आहेत. या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशात काही तरुणांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे देशात अग्निपथ' योजनेविरोधात वातावरण तापलं आहे. यामुळे अमित शाह यांचा नियोजित दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com