नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना; कारमध्ये शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांना अटक!

आरोपींकडून जिवंत काडतुस दोन मोठे चाकू , फरस आणि इतर शस्त्र जप्त केली
नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना; कारमध्ये शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांना अटक!
नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना; कारमध्ये शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांना अटक!मंगेश मोहिते

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर च्या मानकापूर पोलीस स्टेशन (Mankapur Police Station) हद्दीत मोठ्या प्रमाणात शस्त्र घेऊन काहीतरी गुन्हेगारी करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीना पोलिसांनी अटक करून त्यांच्या कडून दोन बनावट माऊजर, जिवंत काडतुस दोन मोठे चाकू , फरस आणि इतर शस्त्र जप्त केली आणि एक मोठी दुर्घटना घडण्यापासून टळली आहे. (Hooligans arrested for carrying weapons in car)

हे देखील पहा-

पोलिसांनी जप्त केलेली ही सगळी शस्त्र घेऊन आरोपींची गॅंग काही तरी विपरीत घटना करण्याच्या तयारीत होती, ही सगळी शस्त्र एका कार मध्ये घेऊन आरोपी दरोडा घालण्याच्या तयारी होते मात्र पोलिसांना याची माहिती समजली आणि पोलिसांनी शोध सुरू केला. मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बस स्टॉप जवळ एका कार मध्ये काही जण बसून दिसले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तर मिळाली मात्र पोलिसांनी कार ची तपासणी केली आणि मोठी शस्त्र त्यांच्या हाती लागली.

नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना; कारमध्ये शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांना अटक!
पुढच्या आठ दिवसांत मोठा संघर्ष उभा करुया; बैलगाडा शर्यतीसाठी पडळकरांचे गाडी मालकाना आवाहन

यामध्ये 2 माऊजर , जिवंत कडतूस , मोठे चाकू , फरसा सगळ्यात मोठा चाकू आणि दोन मोठे दांडके मिळून आले आहेत दरम्यान पोलिसांनी यात दोन आरोपींना अटकही केली असून त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून यांचा शोध पोलीस घेत होती मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात घातक शस्त्र घेऊन हे आरोपी काय करणार होते याचा शोध पोलीस घेत आहे मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठी घटना होता होता टळली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com