Ahmednagar Accident News: नगर-जामखेड रोडवर भयानक अपघात; मद्यधुंद पिकअप चालकाने ५ जणांना उडवलं

Ahmednagar Accident News: . जामखेडकडून नगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या मद्यधुंद पिकअप चालकाने दुचाकीसह रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलांना जोरदार जोरदार धडक दिली.
Ahmednagar Accident News
Ahmednagar Accident NewsSaam TV

सुशिल थोरात, साम टीव्ही

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जामखेडकडून नगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या मद्यधुंद पिकअप चालकाने दुचाकीसह रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलांना जोरदार जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिला एक तरुण आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. (Breaking Marathi News)

Ahmednagar Accident News
Sangli Crime News: भयंकर! नवऱ्याचा खून करून बायको फरार; पोलीस तपासांत धक्कादायक कारण उघड

अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वत्सला भानुदास चांदणे, असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पिकअप चालकाला पकडून बेदम चोप दिल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेला पिकअप टेंम्पो चालक जामखेडकडून भरधाव वेगात नगरकडे निघाला होता. त्याचवेळी शेतातून लाकडे जमा करणाऱ्या महिला रस्त्याच्या कडेला जात होत्या.

Ahmednagar Accident News
Buldhana News: एकाच दिवशी दोन जणांनी उचललं टोकाचं पाऊल; भयानक घटनेनं अख्खं गाव हळहळलं

पिकअप टेंम्पो नगर-जामखेड रोडवरील निंबोडी गावाजवळ आला असता, चालकाने समोरून येत असलेल्या दुचाकीसह महिलांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण (Accident) होती की, यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालकासह इतर ४ जण गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच, निंबोडी गावातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तातडीने उपचारासाठी अहमदनगर (Ahmednagar) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिकअप टेम्पो ड्रायव्हर हा मद्यपान केलेल्या अवस्थेत दिसल्याने नागरिकांना त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून चालकाची सुटका करत त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com