तेरावीसाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

पिंपळनेरी-खापरी मार्गावरील उमरी फाट्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले.
तेरावीसाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू
तेरावीसाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यूSaam Tv

चंद्रपूर - पिंपळनेरी-खापरी मार्गावर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. जखमींवर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

ही घटना काल सायंकाळी (६ डिसेंबर) आठ वाजताच्या सुमारास घडली आहे. सायत्रा मोतीराम मेश्राम (६५) कमल चुनारकर (४५) आणि मोतीराम मेश्राम (७०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर उत्तम चुनारकर (४५) व अंकित राजू मेश्राम (१०) अशी जखमी रुग्णांची नवे आहेत. या अपघातबाबाद बाबाद पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.

तेरावीसाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले; उपमुख्यमंत्री म्हणाले केंद्राने...

खापरी धर्मू येथील चुनारकर आणि मेश्राम हे दोन्ही कुटुंबीय चारचाकी वाहनाने तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. पिंपळनेरी-खापरी मार्गावरील उमरी फाट्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. या भिषण अपघातात या मायलेकीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर जखमी अवस्थेत असलेले वडिल मोतीराम मेश्राम यांना उपचारासाठी चंद्रपूरात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com