पॅरालीसीसचा उपचार घेणाऱ्या वृद्धाला रुग्णालयात चावल्या मुंग्या; गुप्तांगसह डोळ्यांना जखमा (पहा Video)

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला गुप्तांग,डोळे, पाठ आदी भागात लाल मुंग्या चावल्याने जखमा झाले असल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.
पॅरालीसीसचा उपचार घेणाऱ्या वृद्धाला रुग्णालयात चावल्या मुंग्या; गुप्तांगसह डोळ्यांना जखमा (पहा Video)
पॅरालीसीसचा उपचार घेणाऱ्या वृद्धाला रुग्णालयात चावल्या मुंग्या; गुप्तांगसह डोळ्यांना जखमा (पहा Video)SaamTV

अमरावती : अमरावती शहरातील डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व (Dr. Punjabrao Deshmukh Medical College) रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विषणुपंत साठवणे यांना गुप्तांग, डोळे, पाठ आदी भागात लाल मुंग्या चावल्याने जखमा झाले असल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार विष्णुपंत साठवणे यांना पॅरालीसीस (Paralysis) झाल्याने त्यांच्यावरती अमरावती (Amaravati) येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार सुरु होते. मात्र त्यांना दाखल केलेल्या त्या रुग्णालयातील जागेवरती लाल मुंग्यांचा (Red Ants) वावर असल्याने त्या मुंग्यानी रुग्णाच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतला होता.

पॅरालीसीसचा उपचार घेणाऱ्या वृद्धाला रुग्णालयात चावल्या मुंग्या; गुप्तांगसह डोळ्यांना जखमा (पहा Video)
धक्कादायक : विवाहितेचा मृत्यू, अंगावरती मारहाणीचे व्रण; पतीसह सासरची मंडळी फरार

दरम्यान ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आपल्यासोबत तेथिल कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तरे देत वादघातला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले शिवाय सध्या विष्णुपंत साठवणे यांना डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येथून दुसरीकडे उपचाकरता नेण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.