
Hingoli News: हिंगोलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका घरात गरम पाण्याच्या हिटरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कुटुंबातील ५ जण भाजले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Latest Heater Blast News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील राजुरा गावात ही भीषण घटना घडली आहे. घरात हिटर लावलेला असताना तो बंद करण्याचे लक्षात न राहिल्याने ही घटना घडली आहे. यावेळी घरात ५ व्यक्तींसह एक दीड वर्षांचं बाळ देखील होतं.
या घटनेत दीड वर्षांचं बाळ देखील भाजलं आहे. लहान बाळांची त्वचा नाजूक असल्याने या बाळाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्याच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उजडालीये. हिटरचा स्फोट झाला तेव्हा मोठा आवाज झाला. यावेळी जखमींना वाचवण्यासाठी शेजारच्या नगरिकांनी धाव घेतली.
यामध्ये दीड वर्षीय चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. या घटनेतील कुटुंब दररोज प्लास्टिक टाकीमध्ये हिटर लावून अंघोळीसाठी जात होते. आज सकाळी देखील नेहमीप्रमाणे हिटर द्वारे पाणी गरम करत असताना अचानक स्फोट होऊन या गावातील धुरपता मुंडे, बालाजी मुंडे साहेबराव मुंडे यांच्या सह दीड वर्षीय गणराज मुंडे गंभीर जखमी झाला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.