कणकवलीतील एका आगळ्या वेगळ्या हॉटेलची चर्चा

हे हॉटेल इतर हॉटेलपेक्षा फार वेगळे आहे.
कणकवलीतील एका आगळ्या वेगळ्या हॉटेलची चर्चा
कणकवलीतील एका आगळ्या वेगळ्या हॉटेलची चर्चाअनंत पाताडे

सिंधुदुर्ग -  कोकणात Kokan प्रथमचं आणि मुबंई Mumbai गोवा हायवे लगत असलेल्या कणकवलीतील वागदे येथील एका आगळ्या वेगळ्या हॉटेलची चर्चा रंगू लागली आहे. तरुण युवक अनिकेत गुरवने हॉटेल मॅनेजमेंटचा Hotel Management कोर्स केला परंतु गेल्यावर्षी कोरोनामुळे त्याचा जॉब गेला. त्यातून सावरत त्यांनी  नॅशनल हायवे फूड गॅरेज हॉटेलची Hotel निर्मिती केली आहे. हे हॉटेल इतर हॉटेलपेक्षा फार वेगळे आहे.

हे देखील पहा -

याचं हॉटेलची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा सुरू असताना आता महाराष्ट्रभर या हॉटेलचे फोटो व्हायरल होत आहे. त्यांनी टाकाऊ पासून टिकावू वस्तूंची निर्मिती करून हॉटेल साकारण्याचा प्रयत्न केला. भंगारमध्ये टाकण्यात आलेल्या जुन्या गाड्या आणि ऑइल ड्रम वापरून हॉटेलची रचना केली आहे. त्यामुळे हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे हे हॉटेल पहाण्यासाठी आणि येथील पदार्थ खाण्यासाठी हळूहळू नागरिकांची  पसंती मिळताना पाहायला मिळत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com