बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून !; बुलढाण्यातील घटना
बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून !; बुलढाण्यातील घटनासंजय जाधव

बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून !; बुलढाण्यातील घटना

श्री अग्रसेन चौकात सकाळी उघडकीस आली घटना..

संजय जाधव

बुलढाणा: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव शहरात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा दगडाने ठेचून निर्घुणपणे खून (Kill) करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासचक्रे फिरवीत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तर आपल्याला बिडी दिली नाही म्हणून आपण त्याला ठार केल्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा-

शेगाव शहरातील श्री अग्रसेन चौक येथील दार्जिलिंग चहाच्या दुकाना समोर एका इसमाचे दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्याने दुकान मालकाने याबाबतची माहिती शेगाव शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह असलेल्या घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी सूत्रे हलवीत परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने एका युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आपण मृतकाला बिडी आणि पाणी मागितले मात्र त्याने आपल्याला दिले नाही म्हणून आपणच त्याला दगडाने ठेचून ठार केले असल्याची कबुली दिली आहे.

बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून !; बुलढाण्यातील घटना
पुण्यात चारचाकी वाहनाला चक्क 'नो हेल्मेट'चा दंड!

दुसरीकडे राणी नावाच्या श्वानानेही आरोपीला ओळखले आहे. मृतकाची ओळख जयवंत देशमुख राहणार तुदगाव जिल्हा अकोला अशी झाली असून तो काही दिवसांपूर्वी जवळच्याच सत्कार भोजनालय मध्ये कामावर होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. आरोपीचे नाव संतोष बाळू सरोदे (वय 25) राहणार लोणार असे असल्याचे समजते. शहर पोलीस सध्या तपास करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com