
बीड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी पायी तिरुपती येथे जाणाऱ्या सुमंत रुईकर (Sumant Ruikar) या शिवसैनिकाचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबाचं पालकत्व स्वीकारले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी घर बांधून देण्याचे आश्वासन दिलं होतं. आज अखेर मंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द पाळलाय. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुईकर यांच्या घराचे भूमीपूजन करण्यात आलं आहे. या भूमीपूजनाला मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत. तर यापुढील पूर्ण जबाबदारी मंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी असणारे बाजीराव चव्हाण यांच्यावर देण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. तर रुईकर कुटुंब शिवसेनेच्या (Shivsena) मदतीने भावुक झाले होते.
उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना लवकर बरं वाटावं तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी पायी तिरुपती बालाजीला जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी पायी चालायला सुरुवात देखील केली. मात्र रस्त्यात अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. २६ डिसेंबर रोजी कर्नाटक मधील रायचूर येथे उपचारा दरम्यान त्यांचा दुःखद अंत झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे सम्पूर्ण कुटुंब निराधार झाले होते. ही बातमी समजल्यावर संवेदनशील मंत्री अशी ओळख असलेले शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत पाठवली होती. तसेच, ही मदत दिल्यावर फोन करून त्यांची विचारपूस देखील केली होती. मात्र, त्यानंतर आज एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. आज रुईकर यांच्या नवीन घराचं भूमिपूजन बीड येथे पार पडलं.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.