विविध असूनही एक कसे राहायचे, जगाने भारताकडून शिकले पाहिजे : सरसंघचालक मोहन भागवत

मोहन भागवत यांनी रविवारी नागपुरातील उत्तीष्ठ भारत कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
Mohan Bhagawat
Mohan BhagawatSaam Tv

नागपूर : 'आपण वेगळे दिसू शकतो. आपण वेगवेगळ्या गोष्टी खाऊ शकतो. पण आपण एकात्मतेने अस्तित्वात आहोत. वैविध्यपूर्ण असूनही एकजूट राहणे आणि पुढे जाणे हे जग भारताकडून शिकू शकते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagawat) म्हणाले. भागवत यांनी रविवारी नागपुरातील (Nagpur) उत्तीष्ठ भारत कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Mohan Bhagawat
ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा विमानतळावर गोळीबार, १ जण ताब्यात

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, समाज आणि देशासाठी काम करण्याची शपथ घ्या. देशासाठी काम करू, देशासाठी आयुष्य समर्पित केले पाहिजे.

जोश तरुणाई च दुसरं नाव आहे. मात्र तरुणांना होश देखील असायला पाहिजे, स्वतंत्र भारताचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना २०४७ मध्ये भारत कसा असावा यासाठी चे नियोजन करावे लागेल. वंदे मातरमचे नारे दिले तर अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली होती. भारतात विदेशी आक्रमण सुरू झाल्यापासून आजपर्यंत कोटी कोटी लोकांनी बलिदान दिले, असंही मोहन भागवत (Mohan Bhagawat) म्हणाले.

Mohan Bhagawat
PM Modi| देशासाठी मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा अभिमान; नरेंद्र मोदींकडून खेळाडूंचं कौतुक

व्हिजन आणि अॅक्शनसाठी आजपासून तयार राहावे लागेल. भारत ३००० वर्ष सतत सर्वोच्च स्थानी राहिला आहे, त्यांनी कोणावर आक्रमण केले नाही. तो वैभवशाली भारत पुन्हा एकदा पाहायचा आहे. जे इतिहासकार भारत ३००० वर्ष जुना सांगतात ते अपडेट नाहीत. भारत ९००० वर्ष जुना आहे. पण हे आपल्या अभ्यासक्रमात नाही. पाठ्यक्रम बदलून हे सगळ सांगावे लागणार आहे. संस्कृतच व्याकरण ज्या भागात जन्मल ते आज भारतात नाही, असंही भागवत (Mohan Bhagawat) म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com