
Nashik News : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. हावडा मेलच्या बोगीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. नाशिकरोड (Nashik) रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याजवळ हावडा मेलच्या बोगीला अचानक आग (Fire) लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला आहे.(Howrah mail Catches Fire)
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. बोगीला आग लागल्यामुळे स्थानकावर धुराचे लोट पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हावडा मेल नाशिकरोड रेल्वे स्थानकात पोहचताच लागली आग. रेल्वेला आग लागल्याचे समजतच प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. सध्या अग्निशमन दलाकडून आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. हेड वायर तुटल्याने प्लॅटफॉर्म 3 वरील वाहतूक तूर्तास बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक प्लॅटफॉर्म 1 व 2 वर वळवण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबई कडे जाणारी रेल्वे विस्कळीत झाली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.