
Paper Leak: बुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला, त्यानंतर सगळीकडे एकच गोंधळ सुरू झाला. सोशल मीडियावर आर्धा तास आधी प्रश्नपत्रीका टाकण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या हातात पेपर न देता पेपर फुटला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा पेपर फोडला नाही हे नक्की होते. अशात हा पेपर नेमका कोणी फोडला याबाबत चर्चा सुरू झाली. अशात आता या विषयी मोठी माहिती समोर आली आहे. यामध्ये पैशांची अफरातफर झाल्याचं देखील विश्वासनीय सूत्रांनी सांगितलं आहे. (Buldhana 12th Paper Leak)
मिळालेल्या माहितीनुसार, पेपरफुटीप्रकरणामध्ये ५ जणांना अटक करण्यात आली आहे. व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी केली जात होती. एकूण ९९ जणांचा ग्रूप बनवण्यात आला होता. यामार्फत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेतले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोन शिक्षकांना अटक
या प्रकरणात शेजारील गावामधील तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर शाळेतील २ शिक्षकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कलम २४० आणि १२० ब अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या संपू्र्ण घटनेचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस अटक केलेल्या ५ जणांची कसून चौकशी करत आहेत.
राज्यात अर्थसंकल्प अधिवेशनातही पेपरफूटीचे पडसाद दिसले. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. या मुद्द्यावरून सरकारने कडक कारवाई करण्यात यावी असे आदेशही दिले. पुढे हा पेपर रद्द करून पुन्हा दुसरी परीक्षा घेण्यात यावी असं देखील म्हटलं जात होतं, मात्र तसं झालं नाही. पुढे गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी पेपरफुटीप्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणानंतर बुलढाण्यातील ४ परीक्षा केंद्रांचे संचालक तातडीणे बदण्यात आले आहेत.पोलीस या प्रकरणी आधिक तपास करत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.