
HSC RESULT 2023: बहुप्रतिक्षीत असलेला इयत्ता बारावीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजतापासून निकाल संकेतस्थळावर बघायला मिळणार आहे. राज्यात पुणे विभागाचा सर्वाधिक ९३.३४ टक्के निकाल लागला आहे. तर नाशिक विभागाचा निकाल ९१.६६ टक्के इतका आहे. नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ००२ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. (12th HSC Result 2023 Date)
इयत्ता बारावीचा राज्याचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व नऊ विभागांचा विभागनिहाय निकाल जाहीर केलेला आहे. राज्यस्तरावर विज्ञान शाखेचा निकाल ९६.०९ टक्के इतका लागला आहे. तर वाणिज्य शाखेचा निकाल ९०.४२ टक्के, कला शाखेचा निकाल ८४.०५ टक्के इतका लागला आहे.
राज्यस्तरावर १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची संख्या ६ लाख ८४ हजार ११८ इतकी असून, उत्तीर्णाची टक्केवारी ८९.१४ टक्के आहे. तर ६ लाख ८ हजार ३५० मुली उत्तीर्ण झालेल्या असून, मुलींच्या उत्तीर्णाची टक्केवारी ९३.७३ टक्के इतकी आहे.
विभागनिहाय निकाल असा-
पुणे-----------९३.३४
नागपूर-------९०.३५
औरंगाबाद---९१.८५
मुंबई---------८८.१३
कोल्हापूर----९३.२८
अमरावती----९२.७५
नाशिक--------९१.६६
लातूर---------९०.३७
कोकण---------९६.०१
इथे पहा निकाल...
mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org
https://hindi.news18.com/news/career/ board-results-maharashtra-board
https://www.indiatoday.in/education-today/ maharashtra-board-class- 12th result 2023
http://mh12.abpmajha.com
परिक्षेसाठी कॉपी मुक्त अभियान
शालेय शिक्षण विभाचे प्रधान सचिव तसेच विविध सर्व मान्यवरांच्या उपस्थित यंदाची परीक्षा कॉपीमुक्त झाली. यावेळी २७१ भरारी पथके काम करत होते. त्यामुळे बारावीची परीक्षा जास्तीत जास्ता कॉपी मुक्त होऊ शकली, असं शरद गोसावी म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.