अभिनंदन! बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी

बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
HSC Result 2022 News, HSC Result 2022 Latest Marathi News Updates
HSC Result 2022 News, HSC Result 2022 Latest Marathi News UpdatesSaam Tv

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra Board) इयत्ता बारावीचा निकाल जाहीर (HSC Result 2022 केला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. विशेष बाब म्हणजे निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थीनीचा निकाल ९४.३२ टक्के इतका आहे, तर विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२९ टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीची परीक्षा ही संपूर्ण राज्यभरातील एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी दिली होती. (HSC Result 2022 Latest Marathi News)

HSC Result 2022 News, HSC Result 2022 Latest Marathi News Updates
कोरोनाने टेन्शन वाढवलं! देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत तब्बल ४१ टक्क्यांनी वाढ

दरम्यान, फेब्रुवारी-मार्च २०२० च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १४ लाख ४९ हजार ६६४ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - १४, ४९,६६४

एकूण परीक्षा दिलेले विद्यार्थी - १४,३९,७३१

एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - १३,५६,६०४

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी - ९३.२९

एकूण उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी - ९५.३५

HSC Result 2022 News, HSC Result 2022 Latest Marathi News Updates
गृहकर्ज, कार लोनचे हफ्ते वाढणार; RBI ने रेपो दरात केली वाढ

निकालाची वैशिष्ट्ये

सर्वाधिक निकाल कोकण विभाग - ९७.२१ टक्के

सर्वात कमी निकाल मुंबई विभाग - ९०.९१ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रमांचा निकाल ९८.८० टक्के

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल - ९५.२४ टक्के

शाखानिहाय निकाल

विज्ञान शाखा - ९८.३० टक्के

वाणिज्य शाखा - ९०.५१ टक्के

कला शाखा - ९१.७१ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम - ९२.४० टक्के

विभागनिहाय टक्केवारी

कोकण - ९७.२१ टक्के

पुणे- ९३.६१ टक्के

नागपूर - ९६.५२ टक्के

औरंगाबाद - ९४.९७ टक्के

मुंबई- ९०.९१ टक्के

कोल्हापूर -९५.०७ टक्के

अमरावती - ९६.३४ टक्के

नाशिक - ९५.२५ टक्के

लातूर - ९५.२५ टक्के

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com