Washim: रिसोड येथील बिछायात केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग
Washim: रिसोड येथील बिछायात केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग गजानन भोयर

Washim: रिसोड येथील बिछायात केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग

आगीत एकाचा होरपळून मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी...

वाशिम - जिल्ह्याच्या रिसोड शहरातील सराफ लाईन भागात असलेल्या मंगलम बिछायत केंद्राच्या गोदामाला रात्री 10:30 च्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या सिलेंडर स्फोटमध्ये आशिष राऊत हा 16 वर्षीय मुलगा जागीच ठार तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

हे देखील पहा -

या आगीत गोदाम संपूर्ण जळून खाक झाला आहेत. या आगीमुळे लाखोंचं नुकसान झालं आहे. तसेच स्फोटात गंभीर जखमींना वाशिम येथे पाठविण्यात आले असून,आग विझविण्यासाठी रिसोड अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. नेमकी आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Washim: रिसोड येथील बिछायात केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग
Beed: आता लस घेतली तरच उघडता येणार दुकाने

आग लागल्यचे लक्षात येताच नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीवर नियंत्रण मिळवता न आल्याने अग्निशमनदलाला घटनास्थळी बोलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पोलीस देखील घटनास्थळी हजर झाले होते. या आगीत गोडाऊनमधील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com