बदलापुरात भरदुपारी तीन झाडं कोसळली; सुदैवानं जीवितहानी नाही

Badlpaur News : बदलापुरात आज अचानक तीन मोठी झाडं रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली
बदलापुरात भरदुपारी तीन झाडं कोसळली; सुदैवानं जीवितहानी नाही
Huge tree falls on running Auto Rickshaw in badlapur Saam Tv

बदलापूर : बदलापुरात (Badlapur) आज अचानक तीन मोठी झाडं रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षेवर ही झाडं कोसळल्यानं रिक्षेचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, रिक्षाचालकासह प्रवाशांनी वेळीच बाहेर उडी मारल्यानं सुदैवाने कुणालाही काहीही इजा झालेली नाही. (Huge tree falls on running Auto Rickshaw in badlapur )

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षावर झाड कोसळलं. या घटनेमुळे रिक्षाचा (Rickshaw) मोठं नुकसान झालं. मात्र, रिक्षात बसलेल्या महिला प्रवाशांसह रिक्षा चालकाने बाहेर उडी मारल्यानं सुदैवाने जीवितहानी टळली. बदलापूर पूर्वेच्या मच्छी मार्केट परिसरात आज दुपारी ही झाडं कोसळण्याची घटना घडली. गजबजलेल्या परिसरात अचानक झाड कोसळल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. याच झाडाखाली दररोज मासे विक्रेते बसतात. सुदैवानं आज हे विक्रेते नसल्यानं मोठी जीवितहानी टळल्याची बोलले जात आहे. अचानक झाड कोसळल्यानं काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सदर ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजूला केले. तसेच वाहनचालकांना मार्गही मोकळा करून दिला.

Huge tree falls on running Auto Rickshaw in badlapur
कांदा रडवतोय! चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

दरम्यान, सदर ठिकाणी झाड हे जीर्ण झालेलं होतं. दुपारच्या सुमारास जोरात वारा आल्याने हे झाड कोसळलं. हे झाडं कोसळताना इतर दोन लहान झाडांनाही घेऊन कोसळलं.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.