शिवसेनेला खिंडार, वर्ध्यात माजी जिल्हा प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे भाजपा आमदार दादाराव केचे यांच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार होते.
शिवसेनेला खिंडार, वर्ध्यात माजी जिल्हा प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
BJP/ShivsenaSaam TV

सुरेन्द्र रामटेके -

वर्धा : आज भाजप कार्यकर्ता मेळाव्यात विधान परिषदेचे आमदार व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे माजी वर्धा जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे भाजपा आमदार दादाराव केचे यांच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार होते. मात्र व्यसतेमुळे ते या मेळाव्यास उपस्थित राहिले नाहीत. मात्र सायंकाळी अखिल भारतीय हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

BJP/Shivsena
Satara: गुणरत्न सदावर्तेंविरोधात सातारा पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणा

आज या कार्यकर्ता मेळाव्यात विधान परिषदेचे आमदार व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शिवसेनेचे माजी वर्धा जिल्हा प्रमुख निलेश देशमुख (Nilesh Deshmukh) यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी. माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे, माजी आदिवासी मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी पक्ष प्रेवेश केला. या वेळी खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, आमदार डॉ.रामदास आंबटकर, राजेश बकाने सचिव भाजपा महाराष्ट्र प्रदेश, सुनील गफाट जिल्हाध्यक्ष भाजपा वर्धा यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com