बीडमध्ये पती-पत्नीची आत्महत्या!

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या उत्तरेश्वर पिंपरी गावात, प्रेमी युगल असणाऱ्या पती-पत्नीने, आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे.
बीडमध्ये पती-पत्नीची आत्महत्या!
दुबारपेरणी व कर्जामुळे पती- पत्नीची आत्महत्याSaamTv

बीड : बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या उत्तरेश्वर पिंपरी गावात, प्रेमी युगल असणाऱ्या पती-पत्नीने, आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. आकाश शिवाजी धेंडे (वय 32) व सावित्री आकाश धेंडे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. Husband and wife commit suicide in Beed!

हे देखील पहा -

केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील आकाश धेंडे हा त्याच्या आई वडिलांसह कोल्हापूर येथे वास्तव्यास होता. तो कोल्हापूरमध्ये मजुरीचे काम करत असताना, घराशेजारी राहत असलेल्या सावित्रीशी त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यादरम्यान सावित्रीच्या दोन मुलांसह, गेल्या 4 महिन्यापूर्वी हे प्रेमी युगल, कोल्हापूरहुन उत्तरेश्वर पिंपरी येथे येऊन आकाश धेंडे याच्या घरी राहत होते.

दुबारपेरणी व कर्जामुळे पती- पत्नीची आत्महत्या
कोविड सेंटरमधील खिडकीचे गज कापून कैद्याचे पलायन!

मात्र आकाश घराबाहेर गेल्या नंतर सावित्रीने घरात स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा आकाश घरी आला तेव्हा हा प्रकार दिसून आल्याने, त्याने शेजारील वयोवृद्ध महिलेस बोलावून घेत तिला घडलेला प्रकार दाखवला. त्यांनतर सदर महिला तेथून निघून गेल्यानंतर आकाश धेंडे याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान कोल्हापूर येथून गावी आलेल्या प्रेमी युगलाने आत्महत्या का केली ? याचा तपास केज पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com