दुर्देवी! मंदिरात पूजा करण्यासाठी गेले अन् होत्याचं नव्हतं झालं

दाम्पत्याच्या मुलाचे लग्न काही दिवसापूर्वीच झाले होते.
दुर्देवी! मंदिरात पूजा करण्यासाठी गेले अन् होत्याचं नव्हतं झालं
Pune PoliceSaam Tv

वर्धा : हिंगणघाट पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या तिर्थक्षेत्र साकृर्ली येथे मंदिरात पूजा अर्चा करण्यासाठी आलेल्या दाम्पत्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना तरोडा येथे घडली आहे. तरोडा येथील आत्माराम बोरकर व त्यांची पत्नी कुंदा आत्माराम बोरकर हे दोघेही १ महिन्यांपूर्वी मुलाचे लग्न झाल्याने देवीची पूजा अर्चा करण्यासाठी आले होते. (Wardha Latest News)

Pune Police
देशात कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत आढळले 12 हजारांहून अधिक रुग्ण, 11 मृत्यू

पोलिसांनी (police) दिलेली माहिती अशी की, आत्माराम बोरकर यांच्या मुलाचे लग्न मागिल काही दिवसापूर्वी झाले होते. त्यामुळे ते मंदिरात पूजा करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा करुन, मंदिराच्या पाठिमागे असणाऱ्या नदीमध्ये पूजा करण्यासाठी गेले होते, यावेळी पूजा करत असताना आत्माराम यांच्या पत्नी कुंदा यांचा पाय घसरुन त्या नदीच्या पाण्यात बुडाल्या.

Pune Police
वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधान मोदींकडून आईला मोठं गिप्ट; रस्त्याला देणार हिराबेन यांचं नाव!

यावेळी आत्माराम यांनी पत्नीला वाचवण्यासाठी पाण्यात गेले, पत्नीला वाचवताना तेही नदीत बुडाले, या घटनेत दाम्पत्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनाास्थळी दाखल झाले. दाम्पत्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदवासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. यया घटेनेची नोंद हिंगणघाट पोलिसांत करण्यात आली आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस (Police) करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्माराम बोरकर यांच्या मुलाचा काही दिवसापूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी ते देव दर्शनासाठी आले होते. (Wardha Latest News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com