कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा धारदार शस्त्रांनी खून!

अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या सिरसो येथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत दोन जण ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे.
कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा धारदार शस्त्रांनी खून!
murderSaamTvnews

अकोला : अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या सिरसो येथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत दोन जण ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे. सिरसो गावातील गिरी परीवारात गेले काही दिवस कौटुंबिक वाद सुरु होता. या वादाचे पर्यवसन आज हाणामारीत झाले. किशोर विठ्ठल गिरी (42) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी दुर्गा किशोर गिरी (38) हिचा अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे देखील पहा :

दुर्गाची आई जिजाबाई निरंजन गिरी हाणामारीत गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरु आहेत. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कुटुंबात शाब्दिक वाद झाला. सैय्यद जाबीर, अर्चना गिरी, बेबी मोहन गिरी व ईश्वर पुरी यांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात किशोर व दुर्गा याच्या डोक्यात लोखंडी सब्बलने व विळ्याने जोरदार वार करण्यात आले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

murder
Breaking : अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलावर मालकाचा अनैसर्गिक अत्याचार!

या प्रकरणी पोलीसांनी सैय्यद जाबीर, बेबी गिरी, अर्चना गिरी यांना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी ईश्वरचा पोलीस शोध घेत आहेत. मृतकाचा मुलगा रोहन गिरी याने ग्रामीण पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, घटनेसंदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पुढील तपास उपविभागीय अधिकारी संतोष राऊत ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com