बायकोसाठी कायपण! नांदायला येत नाही म्हणून नवरा चढला ४४० व्होल्टच्या टॉवरवर

रायगडमधील माणगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Husband wife news
Husband wife newssaam tv news

माणगाव : नवरा-बायकोमध्ये भांड्याला भांड लागतं, म्हणजेच क्षुल्लक कारणावरुन वाद-विवाद होत असतात, असं म्हणतात. पण रायगडमधील (Raigad) माणगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बायको नांदायला घरी येत नाही म्हणून नवरा चक्क चाळीस मीटर उंच टॉवरवर चढला. अनिल असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने ४४० केव्हीपेक्षा अधिक विद्युत प्रवाह असणार्‍या हायहोल्टेज लाईनच्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Husband wife news
जिवलग मित्राने केली आत्महत्या! दु:ख सहन न झाल्याने दुसऱ्याच दिवशी तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, बायको नांदायला (Husband-wife disputes) घरी येत नाही म्हणून आदीवासी तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. इंदापुर आदीवासी भागात राहणारा अनिलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या पठ्याने आपल्या सासुरवाडीत म्हणजे कोस्ते आदीवासी वाडीजवळ असलेल्या 40 मिटर उंच आणि 440 KV पेक्षा अधिक विद्युत प्रवाह असणार्‍या हायहोल्टेज लाईनच्या टॉवरवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Husband wife news
जिवलग मित्राने केली आत्महत्या! दु:ख सहन न झाल्याने दुसऱ्याच दिवशी तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

शोले चित्रपटापेक्षा थरारक आणि भयानक दृष्य लाईव्ह बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अखेर माणगावचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील,सह पोलिस निरिक्षक नवनाथ लाहंगे,सतिष आस्वर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अनिलला खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर अनिल टॉवरवर खाली उतरल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com