पत्नी माहेरी गेल्याचा विरह सहन न झाल्याने; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
पत्नी माहेरी गेल्याचा विरह सहन न झाल्याने; तरुणाने उचललं टोकाचं पाऊलSaam Tv

पत्नी माहेरी गेल्याचा विरह सहन न झाल्याने; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

कुसळंब या गावात एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली

सोलापूर : सोलापूर Solapur जिल्ह्यामधील कुसळंब या गावात एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी गेल्याच्या कारणाने तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल FIR करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. विशाल चौगुले असे आत्महत्या केलेल्या २२ वर्षीय युवकाचे नाव आहे. मृत विशालची पत्नी मागील काही दिवसांपासून माहेरी गेली होती. यामुळे मृत विशालला नैराश्य आले होते. पत्नी माहेरी गेल्याचा विरह सहन न झाल्यामुळे विशालने मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली आहे.

लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. ४१ वर्षीय रविराज चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विशाल हा ८ नोव्हेंबर दिवशी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. रात्र होऊन देखील तो घरी आला नाही. यामुळे कुटुंबीयांनी त्याची गावात सगळीकडे शोधाशोध केली, पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही.

पत्नी माहेरी गेल्याचा विरह सहन न झाल्याने; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

दरम्यान शोधाशोध सुरू असताना, मयूर सावंत यांनी विशालच्या नातेवाईकांना फोन करून, विशालने गळफास घेतल्याची माहिती दिली आहे. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता, विशाल एका खोलीत दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. विशालला अशा स्थितीत बघून कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला आहे.

या घटनेची माहिती बार्शी तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर, पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या अधारे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पत्नी माहेरी गेल्यामुळे विरह सहन न झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com