Nashik : घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या, नाशिकमधील खळबळजनक घटना

नाशिकच्या वडाळा गाव परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nashik Breaking : दारू प्यायला वीस रुपये दिले नाही म्हणून गळा चिरून हत्या!
Nashik Breaking : दारू प्यायला वीस रुपये दिले नाही म्हणून गळा चिरून हत्या!Saam Tv

तबरेज शेख -

नाशिक: नाशिकच्या (Nashik) वडाळा गाव परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिझवान इसाक पठाण असे या घटनेतील आरोपी पतीचे नाव असून पत्नीची हत्या करून स्वतः पोलीस (Police) ठाण्यात जाऊन हजर होत घटनेची माहिती दिली. आहे.

हुमेरा रिझवान पठाण असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या अनेक दिवसापासून रिझवान आणि हुमेरा या दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. या दोघांमधील हाच वाद टोकाला गेल्याने पती रिझवान याने रागाच्या भरात पत्नी हुमेराचा मोबाईल चार्जरने गळा आवळला त्यातच तिचा मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ -

तर रिझवान याने आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर मृतदेह मृतदेह घरातच ठेऊन तो थेट इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) स्वतः हजर झाला. त्याने सर्व घटनेची माहिती त्याने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला असून पोलिसांकडून या खुनाबाबत अधिक तपास सुरू आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com