धक्कादायक! वाद विकोपाला गेल्याने, पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

पतीने पत्नीची हत्या करून स्वतः ची आत्महत्या
धक्कादायक! वाद विकोपाला गेल्याने, पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या
धक्कादायक! वाद विकोपाला गेल्याने, पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्याSaam Tv

लातूर : जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ या ठिकाणी पती आणि पत्नी मधील वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्यामुळे साकोळ परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. साकोळ येथील सिद्धेश्वर राजेंद्र शिंदे (वय- 35) आणि मनीषा सिद्धेश्वर शिंदे(वय- 32) हे पती- पत्नी कामानिमित्त बाहेरगावी होते.

हे देखील पहा-

मनिषा बरेच दिवसापासुन माहेरी असल्यामुळे काल सिद्धेश्वर याने गोड बोलून पत्नीला रोकडा सावरगाव येथून साकोळ या ठिकाणी आणले. रात्रीच्या सुमारास परत त्या दोघांमध्ये वाद झाला. यातच सिद्धेश्वर याने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली आहे. मनीषाचे माहेर रोकडा सावरगाव या ठिकाणी असून, भानुदास गोविंद कौटुंबे यांची ती मुलगी आहे.

धक्कादायक! वाद विकोपाला गेल्याने, पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या
महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या दाम्पात्यांमध्ये वाद, पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

ही घटना घडली त्यावेळेस घरांमध्ये त्या दोघांन व्यतिरिक्त कोणीही नव्हते. यामुळे सकाळी बराच वेळ ही घटना घराबाहेर समजली नाही. सिद्धेश्वर आणि मनिषा यांना २ मुले असून, मोठा यश (वय- 14) आणि छोटा प्रेम(वय- 11) हे आता पोरके झाले आहेत. लहानपणीच आई- वडिलांचे छत्र हरवल्यामुळे ही मुले आता पोरकी झाली आहेत.

त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे .सकाळी आजूबाजूच्या परिसरात ही बातमी समजल्यानंतर शिरूर अनंतपाळ पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आहे. साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

Edited By- digambar jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com