धक्कादायक! पतीचे विवाहबाह्य संबंध, लाकडी स्टूल डोक्यात घालून पत्नीची हत्या

नागपूर येथे पाचपावलीमध्ये धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Mumbai Police
Mumbai PoliceSaam Tv

नागपूर : येथे पाचपावलीमध्ये धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पाचपावली पोलिसांच्या अंतर्गत असणाऱ्या लष्करीबाग येथे ही घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी स्टूलने हल्ला करत हत्या केलीय. पतीचे विवाहबाह्य संबंध (Extra marital affairs) असल्यामुळे दोघा पती-पत्नीमध्ये (husband-wife disputes) नेहमी वाद-विवाद होत होते. पतीने पत्नीवर हल्ला केला तेव्हा घरात असलेल्या दहा वर्षांच्या मुलीने तिच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. सोनू परशुराम ब्राम्हणे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी (culprit arrested) पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. (Nagpur latest crime news update)

Mumbai Police
राज ठाकरेंनी सांगितला अजय-अतुल यांच्या आईचा 'तो' किस्सा; महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचे केले वर्णन

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या पाचपावलीमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी स्टूलने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. पतीने पत्नीसोबत भांडण केले तेव्हा त्यांची दहा वर्षांची मुलगी घरातच होती.

Mumbai Police
Agriculture News : शेतकऱ्यांनो सावधान! 'या' अळीला चुकूनही स्पर्श करू नका!

मुलीने तिच्या आई-वडिलांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही रागाच्या भरात तिच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com