पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; 3 मुले अनाथ, धक्कादायक घटनेनं नांदेड हादरलं

घटनेनंतर विजयने सुद्धा विष प्राशन करून आत्महत्या केली.
पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; 3 मुले अनाथ, धक्कादायक घटनेनं नांदेड हादरलं
Nanded Crime News Saam Tv

नांदेड : घरगुती भांडणातून पत्नीचा खून (Murder) करुन पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पती-पत्नीचा (Husband-Wife) जीव गेल्याने त्यांचे 3 चिमुकले अनाथ झाले आहेत. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माहुर (Mahur) तालुक्यातील कासार पेठ येथे शुक्रवारी (3 मे) ही दुर्देवी घटना घडली आहे. (Nanded Mahur Crime News)

Nanded Crime News
Jalna Crime: पत्नीने पतीच्या अनैतिक संबंधांची क्लिप माहेरी पाठवली; त्यानंतर घडलं भयंकर

विजय गुलाब जाधव आणि निशा विजय जाधव अशी मृत झालेल्या पती पत्नीची नावं आहेत. माहितीनुसार दोघा पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होते. शुक्रवारी सुद्धा शेतात गेले असताना विजय आणि निशा यांच्यात वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, विजयने पत्नी निशाच्या पोटात चाकूने सपासप वार केले.

या थरारक घटनेत निशा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर विजयने सुद्धा विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, पती पत्नीच्या भांडणात दोन मुली आणि एक मुलगी असे पोरके झालेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात सिंदखेड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com