प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

मृतकाच्या पत्नीनेच ही माहिती पोलिसांना दिली.
प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा
प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटाSaam Tv

गोंदिया जिल्ह्याच्या (Gondia District) दवणीवाडा पोलीस स्टेशनच्या (Davaniwada Police station) हद्दीत येत असलेल्या बघोली गावात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पत्नी व प्रियकराला दावणीवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिरोडा तालुक्यातील बघोली गावात राहणाऱ्या मूनेश्र्वर पारधी याचा मध्यरात्री खूण झाल्याचे निष्पन्न झाले. मृतकाच्या पत्नीनेच ही माहिती पोलिसांना दिली.

दवणीवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, मात्र एकाच खोलीत पती पत्नी झोपले असताना पत्नीला काहीच माहिती नसल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला व त्या आधारे पोलिसांनी उलट तपासणी केली असता महिलेनेच पतीचा काटा काढण्यासाठी आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्या आधारे पोलिसांनी पत्नी व घराशेजारी असलेल्या कुणाल पटले या दोघांना ताब्यात घेतले असून नेमका खून कुठल्या कारणाने केला त्याचा तपास पोलीस करीत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com