मला आमदार जनतेने केले आहे या सरकारने नाही - आ. अभिमन्यू पवार

भाजपच्या १२ निलंबीत आमदारांविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, निलंबन करायचे होते तर सर्वच पक्षातील मिळून ३० ते ४० आमदारांचे व्हायला पाहिजे होते. मात्र जाणीवपूर्वक भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
मला आमदार जनतेने केले आहे या सरकारने नाही - आ. अभिमन्यू पवार
मला आमदार जनतेने केले आहे या सरकारने नाही - आ. अभिमन्यू पवारदीपक क्षीरसागर

लातूर : ओबीसी व मराठा आरक्षणाबद्दल आम्ही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता तेंव्हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही अन्याय करणार असाल तर आम्ही आणखी आक्रमक होऊ असे ते महाविकास आघाडी सरकारवर प्रतिक्रिया देताना म्हणाले. ओबीसी व मराठा आरक्षणाबद्दल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला आहे. I have been made MLA by the people not by this government Abhimanyu Pawar

हे देखील पहा -

भाजपच्या १२ निलंबीत आमदारांविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, निलंबन करायचे होते तर सर्वच पक्षातील मिळून ३० ते ४० आमदारांचे व्हायला पाहिजे होते. मात्र जाणीवपूर्वक भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. दुध का दुध और पाणी का पाणी करायचे असेल तर सीसीटीव्ही मिडियाकडे द्या सर्व सत्य बाहेर पडेल.

मला आमदार जनतेने केले आहे या सरकारने नाही - आ. अभिमन्यू पवार
दहा हजारांची फौज आणून धडा शिकवण्याची भाषा करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड नरमले

तुम्ही एक वर्षांसाठी निलंबन केले पण तुम्ही एक वर्ष सत्तेत राहणार आहेत का असा प्रश्न उपस्थित करून या निलंबनामुळे काहीही फरक पडणार नसून निलंबित आमदारांना फक्त विधानसभेच्या आवारात जात येत नाही बस्स ऐवढेच, बाकी कुठलाही फंड, निधी अथवा विकास कामांवर परिणाम पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या अधिवेशनात एक वाझे बाहेर काढला होता. आता २० वाझे बाहेर निघणार होते म्हणून हे नाटक ठाकरे सरकारने केले आहे. या सरकारने अगोदर मराठा समाजाला वेड्यात काढले आता तेच ओबीसी समाजा सोबत होत आहे. आता राजकीय आरक्षण गेले पुन्हा शैक्षणिक सुध्दा जाईल यामुळे यांच्या विरोधात एकवटून समोर आले पाहिजे असेही ते म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com