आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही माझ्यावरती पडले आहेत - छगन भुजबळ

Central Goverment| केंद्र सरकारचा कारभार तर अवर्णनीय आहे...
आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही माझ्यावरती पडले आहेत - छगन भुजबळ
आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही माझ्यावरती पडले आहेत - छगन भुजबळSaamTV

नाशिक - राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त झाल्यानंतर आज प्रथमच नाशिकला (Nashik) आले होते यावेळी त्यांच कार्यकर्त्यांनी हार घालून आणि फटाके फोडत जंगी स्वागत केलं. दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आज जसे माझ्यावरती हार पडत आहेत तसेच माझ्यावरती प्रहारही पडले असल्याच ते म्हणाले.

पहा व्हिडीओ-

'तुरुंगात असतांना भुजबळांना तुरुंगातून सोडा, या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता आणि याच असंख्य लोकांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळेच मी आज जो काही आहे तो लोकांच्या आशिर्वादामुळे आहे' असही ते म्हणाले.(I have the blessings of the people Chhagan Bhujbal's statement)

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विधानसभा लढलो, विचारांच्या माध्यमातून लढाई लढलो आहे आत्र आजकाल सत्तेचा दुरुपयोग केला जातं आहे 'आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही पडलेत राजकारणात (politics) प्रहार सहन करण्याची तयारी ठेवावी लागते' तसेच सध्या राजकारणातील लोकांची सहनशक्ती कमी होत चालली आहे.मात्र लोक आता हुशार झाली आहेत त्यांना आपण जास्त काळ लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, हे सिद्ध झालं आहे असं म्हणत त्यांच्यावरती आरोप करणाऱ्या विरोधकांवरती भुजबळांनी टीका केली आहे.

आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही माझ्यावरती पडले आहेत - छगन भुजबळ
सांगलीत चिमुरड्यांनी घेतली लाडक्या बाप्पाची काळजी; चक्क गणेशमुर्तीलाच लावले मास्क

केंद्राचा कारभार तर अवर्णनीय आहे

जनता सब जानती है असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवरती (Central Goverment) ही टीका केली गॅस (Gas) किती स्वस्त झाला आहे, पेट्रोल (PetrolRate) किती स्वस्त झाल आहे हे जनतेला कळालं आहे असं म्हणत त्यांनी दरवाढीवरून केंद्र सरकारवरती निशाना साधला आहे.

दमानियांनी खुशाल हायकोर्टात जावं

माध्यमांमुळे आजकाल सर्वांना लगेचचं सर्व काही कळत आहे शिवाय आपल्या देशात लोकशाही आहे अंजली दमानियांनी (Anjali Damania) खुशाल हायकोर्टात (Highcourt) जावं आता आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ असही भुजबळ यावेळी म्हणाले.

"मेरे खिलाफ होनेवाली बातो को मै अक्सर खमोशी से सूनता हुं, जबाब देने का हक मैने वक्त को दे रखा है" अशा शायराना अंदाजात त्यांनी वक्तव्य केलं

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com